गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबईत तीन फेऱ्यांमध्ये विशेष लसीकरण मोहीम
मुंबई दि.१० :- मुंबईतील गोवर रुबेलाची साथ आटोक्यात आणण्यासाठी ‘इंद्रधनुष -५.०’ मोहिमेंतर्गत यू-वीन प्रणालीद्वारे ७ ते १२ ऑगस्ट २०२३, ११ ते १६ सप्टेंबर २०२३ आणि ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ अशा तीन फेऱ्यांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण सत्रामध्ये मुंबईतील २,६३८ बालकांचे आणि ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे.
सांस्कृतीक कार्य संचालनालयाच्या नाट्यस्पर्धेत महापालिकेचे सुरक्षा रक्षक नामपल्ली यांना रौप्यपदक
यामध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या व अर्धवट लसीकरण झालेल्या ० ते ५ वर्षवयोगटातील बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या गोवरच्या उद्रेकानुसार ७ जोखीमग्रस्त विभागात सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ विभागस्तरावर विभाग कृती दल समितीच्या बैठका घेतल्या आहेत. लसीकरण झालेल्या या लाभार्थ्याला करोनाप्रमाणेच डिजीटल लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.