आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम – नियोजनासाठी विशेष समितीची स्थापना

मुंबई दि.०२ :- आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने १३ ऑगस्ट २०२३ ते १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी दादर येथील साने गुरुजी विद्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एका समितीची स्थापना करण्यात आली.

मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचे

समितीच्या कार्यवाहपदी रविंद्र आवटी यांची तर कोषाध्यक्षपदी चंद्रशेखर वझे यांची यावेळी निवड करण्यात आली. शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष राज्य शासनातर्फे साजरे करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ॲड. बाबुराव कानडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर आचार्य अत्रे यांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे, अशी अपेक्षा आचार्य अत्रे यांचे नातू ॲड. राजेंद्र पै यांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकदरबार

राम नाईक यांनी विविध सूचनांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. पंडित वसंतराव गाडगीळ यांनी आचार्य अत्रे विश्वविद्यालयाची कल्पना सविस्तरपणे मांडली. डॉ. कोमरपंत यांनी आचार्य अत्रे यांचा हा शतकोत्तरी जयंती रौप्यमहोत्सव गोव्यात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.