पादत्राणे आणि चामडे क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे विशेष पॅकेज
नवी दिल्ली, दि.११ – पादत्राणे आणि चामडे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामध्ये भारतीय पादत्राणे, चामड्याच्या वस्तू विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. यासाठी 2017 ते 2020 या कालावधीत 2600 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
चामडे क्षेत्रासाठी पायाभूत विकास, पर्यावरणीय समस्येचे निराकरण, अतिरिक्त गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि उत्पादन वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या क्षेत्रात देण्यात येणाऱ्या वाढीव कर सवलतीमध्ये मोठी गुंतवणूक आकर्षित होईल.
Please follow and like us: