भारतात लवकरच परतणार सोनाली बेंद्रे !!
अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. होय, कॅन्सरशी झुंज देत असलेली सोनाली लवकरच घरी परतणार आहे. खुद्द सोनालीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय, न्यूयॉर्कमध्ये अनेक महिने कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर सोनाली घरी परतणार आहे. घरापासून अंतर वाढत तसतस आपलं आपल्या घराशी असलेल नातं घट्ट होत जातं. न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरशी लढताना मी हेच शिकले. आता मी माझे हृदय जिथे वसते, त्या माझ्या घरी परतते आहे. घरी परतण्याचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबाला, मित्रांना भेटणार, याचा खूप आनंद आहे, असे सोनालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :- इफ्फी 2018 च्या सांगता समारंभात ‘इफ्फी’ विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार
अर्थात कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अद्याप संपलेली नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. ‘कॅन्सरशी झुंज संपलेली नाही. पण यादरम्यान मिळालेल्या मध्यांतराचा आनंद आहे. आपल्या माणसांना भेटून मी अधिक ताकदीने कॅन्सरशी लढू शकेल, असे तिने म्हटले आहे. जुलै महिन्यात सोनालीला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. सोनाली बेंद्रे सध्या अमेरिकेत कॅन्सर या आजारावर उपचार घेत आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. सोनाली न्यूयॉर्कला उपचारासाठी रवाना झाल्यापासून बॉलिवूडमधील तिच्या अनेक मित्रमैत्रिणी तिची भेट घेत आहे. नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोनालीची भेट घेतली. नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी आजही सोनाली आणि नम्रता यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे नम्रता आपल्या या लाडक्या मैत्रिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली होती.