पर्यावरण रक्षणाचा संदेश देत श्रीकांत शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवार, ९ एप्रिल रोजी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत असतानाच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र हजारो कार्यकर्त्यांच्या या शक्तीचा उपयोग पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी करून, वृक्षारोपण करून अर्ज दाखल केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा :- पोलिसांच्या हुकुमशाही कामकाजाविरोधात पत्रकारांचे ठिय्या आंदोलन.

हजारो शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते आणि भीमसैनिकांच्या उपस्थितीत, मोठ्या जल्लोषात डॉ. शिंदे यांनी अर्ज दाखल केला. याप्रसंगी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते रवींद्र चव्हाण, माजी खासदार जगन्नाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, किसन कथोरे, डॉ. बालाजी किणिकर, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, जिल्हाप्रमुख प्रल्हाद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, सदानंद थरवळ, भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :- कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल…

या निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीचा मानबिंदू असलेल्या, फडके रोड येथील श्री गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्यानंतर तेथील उद्यानात वृक्षारोपण करून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीतही पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा रथ लोकांचे लक्ष वेधून घेत होता. गेली दोन वर्षे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन अंबरनाथ तालुक्यात लोकसहभागातून दीड लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. पर्यावरण हा आपल्यासाठी केवळ बोलण्याचा विषय नसून प्रत्यक्ष कृतीचा आणि जबाबदारीचा विषय आहे, असे त्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सांगितले.

डॉ. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने संपूर्ण डोंबिवली शहर भगवेमय झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक निघून शिवघोषाच्या गजरात सावळाराम क्रीडा संकुलात दाखल झाली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, आदित्य ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयघोषाने डोंबिवली शहर दुमदुमून निघाले. मिरवणुकीदरम्यान महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीतील महिलांचे लेझिम पथक, ढोलताशांचे पथक, आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email