आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित “वॉकथॉन” ला केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांचा हिरवा झेंडा
नवी दिल्ली, दि.०१ – वयोवृद्ध व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला जातो. या निमित्त नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा मैदानावर ज्येष्ठ नागरिकांसाठी “वॉकथॉन” आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवून त्याची सुरुवात केली. यासोबतच पोलिस बँड, ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक आणि सांगितीक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच सुमिता गोधरा यांनी आरोग्याविषयी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.
केंद्र सरकार वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अनेक सरकारी योजनांची माहिती दिली. या निमित्त मंत्र्यांच्या हस्ते महत्वाचे कार्य करणारे ज्येष्ठ नागरिक तसेच संस्थांना वयोश्रेष्ठ सन्मान देऊन गौरवण्यात आले.