पियुष गोयल यांच्या हस्ते पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देणाऱ्या रेल्वे दृष्टी डॅशबोर्डचा प्रारंभ

नवी दिल्ली, दि.२५ – रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज भारतीय रेल्वेतील सर्व डिजिडायझेशन प्रकल्पांना एकत्रित करणाऱ्या आणि पारदर्शकता तसेच उत्तरदायित्वाला चालना देणाऱ्या रेल्वे दृष्टी डॅशबोर्डचा आज प्रारंभ करण्यात आला. या डॅशबोर्डमुळे देशातल्या नागरिकांना एकाच ठिकाणी विविध स्रोतातील माहिती उपलब्ध होणार आहे. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप संगणक, मोबाईल किंवा टॅबलेटच्या माध्यमातून या डॅशबोर्डमधील माहिती सहज मिळवता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील जनतेवर लक्ष केंद्रित केले असून, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांप्रती या सरकारचे उत्तरदायित्व आहे, असे पियुष गोयल यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :- बौद्धिक मालमत्ता स्पर्धेसाठी सीआयपीएएमने मागवल्या प्रवेशिका

या सरकारने सर्व मंत्रालयांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले. या डॅशबोर्ड अभियानांतर्गत प्रवासी आरक्षण, अनारक्षित तिकीट, माल वाहतूकीतून मिळणारा निधी तसेच एकूण माल वाहतूक याविषयी माहिती सहज उपलब्ध होणार आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून देशभरातल्या कुठल्याही रेल्वे स्थानकाची माहिती मिळू शकेल. रेल्वे द्वारे उपलब्ध होणाऱ्या सर्व डिजिटल सेवांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होईल, तसेच भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील कुठल्याही रेल्वे गाडीची माहितीही मिळू शकेल. या डॅशबोर्डवर प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतील, तसेच माल वाहतूकीची माहिती यासह एकूण 15 सेवा उपलब्ध होणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email