नितीन गडकरी करणार रस्ते जोडणी प्रकल्पांची पायाभरणी

नवी दिल्ली, दि.२८ – केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक, नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रिंग रोड-डीएनडी नाक्याला दिल्ली-मुंबई जलदगती मार्गाला जोडणाऱ्या 6 मार्गिकांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :- ‘आयुष’ मंत्र्यांच्या हस्ते उद्या राष्ट्रीय युनानी औषध संस्थेची पायाभरणी

59 कि.मी. लांबीचा महामार्ग रिंग रोड-डीएनडी नाक्यापासून सुरु होणार असून, कालिंदी कुंज-मिठापूर रोड इथे दिल्ली-मुंबई जलदगती मार्गाला जोडला जाणार आहे. या प्रकल्पाला 3 हजार 580 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नवी दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इतर 9 प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email