श्री गणेश मंदिर संस्थानचा खाद्यतेल यज्ञ
डोंबिवली आसपास प्रतिनिधी
डोंबिवली- श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवलीतर्फे येत्या ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी खाद्यतेल यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा केला जातो. नागरिकांना आवाहन करून त्यांच्याकडून खाद्यतेल जमा केले जाते. हे जमा झालेले तेल ठाणे जिल्ह्यातील विविध गावांतील विद्यार्थी वसतिगृह, वृद्धाश्रम, अपंगालय अशा संस्थाना दिले जाते.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हील क्लब,डोंबिवली वेस्ट गेली आठ वर्षे या उपक्रमातत सहभागी होत आहेत.
नागरिकांकडून सुमारे ७०० किलो खाद्यतेल या उपक्रमांतर्गत जमा होत आहे. नागरिकांनी याबद्दल यात सहभागी व्हावे आणि ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी किमान काही खाद्यतेल संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान गणेश मंदिर संस्थान, फडके रस्त्ता, डोंबिवली पूर्व येथे जमा करावे किंवा खाद्यतेलासाठी निधी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
——