भारतीय कौशल्य स्पर्धेतील टीम ओदिशाच्या विजेत्यांशी धर्मेंद्र प्रधान यांनी साधला संवाद
नवी दिल्ली, दि.०८ – भारतीय कौशल्य स्पर्धेत पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावणाऱ्या टीम ओदिशाच्या सदस्यांशी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज संवाद साधला.
त्यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि 2019 मध्ये रशियातील कझान येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या तयारीसाठी कौशल्य विकास मंत्रालयाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Please follow and like us: