हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसला धक्का

वृत्तसंस्था

सिमला दि.०८ :- हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये, प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस धरमपाल ठाकूर खांड यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस नेते आणि सदस्यांनी भाजप प्रवेश केला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसच्या एकूण २६ नेत्यांनी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी शिमलाचे भाजपचे उमेदवार संजय सूदही उपस्थित होते. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.