Live Video ; परत शिवशाही बसचा अपघात ५० प्रवासी जखमी

सातारा दि.०९ :- प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. त्यातच साताऱ्यातील पसरणी घाटात सोमवारी शिवशाही बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात ५० प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

हेही वाचा :- बलात्कार प्रकरणांसाठी जलदगती न्यायालय

मिळालेल्या माहितीनुसार, पसरणी घाटात शिवशाही बस आणि खाजगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यात 50 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून जखमींना पांचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

हेही वाचा :- Kalyan ; बॅगमध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांतील राज्यातील अपघातांचा आकडा ५५० वर गेला आहे. याचा अर्थ बसचे दररोज एक ते दोन अपघात होत असल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेशी तर तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार १ जून २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे राज्यभरात ५५० लहान-मोठे अपघात झाले आहेत.

हेही वाचा :- पं.राम मराठे संगीत महोत्सवात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या ५१ वर पोहचली असून, ३७१ गंभीर तर ११५ किरकोळ स्वरूपाचे अपघात आहेत. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान एकूण ४४२ अपघात झाले असून ४४ प्राणांतिक व ३०० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत.

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email