शिवसेनेच्या ५ ते १० विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार ?
मुंबई दि.१७ :- निवडणुकीला काही दिवसच उरलेले असताना शिवसेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरु झाले आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेची युतीची बोलणी सुरु असताना दुसरीकडे शिवसेना स्वबळावर २८८ जागांसाठी चाचपणी करतांना दिसून येत आहे. युतीचं चित्र स्पष्ट नाही पण शिवसेनेने आपल्या 63 आमदारांपैकी साधारणत: 5 ते 10 आमदारांना संधी न देण्याचं ठरवलं आहे.
हेही वाचा :- मनसेच्या सतर्कतेने शहिदांच्या नावाने असलेल्या वास्तूमधील अवैध दारूसाठा जप्त
जे आमदार गेल्या पाच वर्षात ‘मातोश्री’साठी नॉटरिचेबल राहिले आहेत, लोकसभेच्या निवडणुकीत कमी पडले आहेत, ज्यांच्याविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत, जनतेची कामं केली नाहीत, अशा पाच ते दहा जणांना डच्चू देण्याचा विचार शिवसेनने केला आहे. या आमदारांच्या जागी शिवसेनेने दुसरे उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे.
हेही वाचा :- शेतकरी पुन्हा एकदा संकटात टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ
मात्र पक्षात फूट पडू नये म्हणून हे नॉन परफॉर्मर आमदार कोण आहेत याची माहिती उघड केलेली नाही. त्यांची नावं आताच बाहेर आली तर पक्षात मोठं बंड होण्याची शक्यता आहे. म्हणून शिवसेनाही सावध पवित्रा घेताना दिसत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोअर कमिटीने ही नावं काढली असून, त्यांची नावे उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आली आहे. तसंच इतर विद्यमान आमदारांना मात्र पुन्हाहून संधी मिळणार आहे.