शिवरात्री शिव आणि त्याची विविध नावे

एखाद्या देवतेसंबंधी आपल्याला अध्यात्मशास्त्रीय ज्ञान कळले, तर त्या देवतेविषयी आपली श्रद्धा अधिक वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे साहजिकच उपासना भावपूर्ण होते अन् भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी असते. या दृष्टीने या लेखात शिव या शब्दाचा अर्थ आणि शिवाच्या इतर काही नावांचा आध्यात्मिक अर्थ पाहूया.

१. व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. शिव हा शब्द `वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. `वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो.

आ. शिव म्हणजे मंगलमय अन् कल्याणस्वरूप असे तत्त्व.

इ. शिव म्हणजे ब्रह्म अन् परमशिव म्हणजे परब्रह्म.

२. काही नावांचा आध्यात्मिक अर्थ

२ अ. शंकर : ‘शं करोति इति शङ्करः ।’ `शम्’ म्हणजे कल्याण आणि `करोति’ म्हणजे करतो. जो कल्याण करतो तो शंकर होय.

२ आ. महांकालेश्‍वर  : अखिल विश्‍वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव) हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ (महान्काल) आहे. त्याचाही जो ईश्‍वर, त्याला महांकालेश्‍वर म्हणतात.

२ इ. महादेव : विश्‍वसर्जनाच्या आणि व्यवहाराच्या विचाराशी मूलतः तीन विचार असतात – परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान अन् परिपूर्ण साधना. हे तीनही ज्याच्यात एकत्र आहेत, अशा देवास `देवांचा देव’, म्हणजेच `महादेव’, असे संबोधितात.

२ ई. भालचंद्र : भाली, म्हणजे कपाळी ज्याने चंद्र धारण केला आहे, तो भालचंद्र. शिवपुत्र श्री गणपतीचेही `भालचंद्र’ हे एक नाव आहे.

२ उ. गंगाधर : गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्‍चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता. शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले; म्हणून त्याला `गंगाधर’ असेही म्हणतात.

२ ऊ. कर्पूरगौर : शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर’ असेही म्हणतात.

२ ए. पिंगलाक्ष : पिंगल ± अक्ष · पिंगलाक्ष. पिंगल · पिंगळा, घुबडाची एक जात. पिंगल या पक्ष्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कळतो. तसे शिवाला कळते; म्हणून त्याला `पिंगलाक्ष’ असेही म्हणतात.

२ ऐ. अघोर : अघोर · अ ± घोर. अघोर म्हणजे चिंता नसलेला.

२ ओ. नीलकंठ आणि आशुतोष

१. दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिध्द (तयार) असलेला : समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी कोणताही देव त्याचा स्वीकार करण्यास पुढे येईना. तेव्हा शिवाने हालाहल प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले. विषप्राशनामुळे त्याचा कंठ काळा-निळा झाला आणि त्याला नीलकंठ असे नाव मिळाले.

२. आशुतोष म्हणजे सहज प्रसन्न होणारा

शिवाची वैशिष्ट्ये

ईश्‍वराने प्रजापति, ब्रह्मा, शिव, श्रीविष्णु आणि मीनाक्षी या पाच देवतांपासून (तत्त्वांपासून) विश्‍वाची निर्मिती केली. या पाच देवतांत ईश्‍वराची सर्व वैशिष्ट्ये आहेत, तसेच त्या त्या देवतेची आपापली वैशिष्ट्येही आहेत. या लेखात आपण शिवाची वैशिष्ट्ये पाहूया.

१. शिवाची तसेच श्रीविष्णूची तीन रूपे

१ अ. शिवाची तीन रूपे

१. शैव पंथियांचा निर्बीज समाधी अवस्थेतील शिव म्हणजे शिवाचे निर्गुण रूप, म्हणजेच परमेश्‍वर (महाशिव) होय.

२. त्यांचा ध्यानस्थ शिव म्हणजे ईश्‍वर.

३. नृत्य करणारा किंवा पार्वतीसह सारीपाट खेळणारा शिव म्हणजे माया होय.

१ आ. श्रीविष्णूची तीन रूपे

१. वैष्णव पंथियांचा शेषशायी, अनंतशयनी श्रीविष्णु म्हणजे श्रीविष्णूचे निर्गुण रूप, म्हणजेच परमेश्‍वर (महाविष्णु) होय.

२. त्यांचा भक्‍तवत्सल श्रीविष्णु म्हणजे ईश्‍वर.

३. लक्ष्मीसहित श्रीविष्णु म्हणजे माया होय.

२. निर्गुणातील शिव आणि सगुणातील ध्यानस्थ शिव

‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. जर ऑक्सिजन, नायट्रोजन आदींकडे आपण तत्त्व म्हणून पाहिले, तर त्यांचे गुणधर्म (त्यांच्या अस्तित्वाचे गुणधर्म) ही त्यांची स्थिती असते, त्याप्रमाणे हे आहे. सगुण साधना करणार्‍यांसाठी शिव त्याच्या चित्रातील रूपाप्रमाणे आहे आणि निर्गुण साधना करणार्‍यांसाठी शिवाच्या तत्त्वाची निवळ अनुभूती महत्त्वाची आहे.’ – कु. सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्च २००४)

३. शिवाची वैशिष्ट्ये

३ अ. शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये

१. शिवाचा राखाडी रंग

मूळ पांढर्‍या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत; म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरिरावर असते.

२. गंगा

२ अ. व्युत्पत्ती आणि अर्थ

१. ‘गमयति भगवत्पदमिति गङ्गा ।’ म्हणजे ‘जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’.

२. ‘गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिरिति गङ्गा । – शब्दकल्पद्रुम’ म्हणजे ‘मोक्षार्थी अर्थात मुमुक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय’.

२ आ. पृथ्वीवरील गंगा

गंगा नदी हिमालयातील गंगोत्री येथे उगम पावून अनेक उपनद्यांद्वारे बंगालच्या उपसागराला मिळते. हिची एकूण लांबी २५१० कि.मी. आहे. गंगा नदीत आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदूषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते; म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तरी गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे सूक्ष्मातील कळणार्‍यांनाच नाही, तर शास्त्रज्ञांनाही जाणवते.

 

३. चंद्र

शिवाच्या मस्तकी चंद्र आहे. चंद्रमा ही ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य (आल्हाद) या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

४. तिसरा डोळा

अ. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्‍त शक्‍तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्‍तीचे महापीठ

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email