कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरी

डोंबिवली दि.०१ :- कल्याण ग्रामीण मतदारसंघात दिवा आणि २७ गाव आदी ग्रामीण परिसराबरोबच डोंबिवली शहराचा काही भाग येतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा भागात हा मतदार संघ विभागला गेला आहे. या मतदार संघात शिवसेनेची ताकद असली तरी स्थानिक आमदार सुभाष भोईर यांना सेनेच्या एका गटाचा विरोध आहे. त्यामुळे सेनेविरोधात एक गट बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण डोंबिवलीतील चार विधानसभा मतदार संघापैकी कल्याण ग्रामीण हा एकमेव मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आहे.

हेही वाचा :- जिल्ह्यात आज एक उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे भोईर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी ग्रामीणमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली होती. लोकसभा निवडणुकीपासून ते कामालाही लागले होते. २०१४ च्या निवडणुकीतही म्हात्रे इच्छूक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपने त्यांना ऑफर केली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांची समजूत काढण्यात आली होती. त्यावेळी म्हात्रे भाजपची ऑफर नाकारली होती. यंदा म्हात्रे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. मात्र भोईर यांना उमेदवारी मिळाल्याने यंदा ते माघार घेतात का बंडखोरी करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधलय.

हेही वाचा :- ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे दु:खत निधन

लोकसभेच्या निवडणुकीत युतीला १ लाख २६ हजार मते मिळाली तर आघाडीच्या पारड्यात ४३ हजार ८६९ मते मिळाली आहेत. २००९ च्या निवडणुकीत मनसेचे रमेश पाटील हे निवडून आले होते. यंदाही मनसे येथून उमेदवार उभा करणार आहे. मनसेकडून राजू पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून संतोष केणे यांना गळ टाकली जात आहे. मात्र, ऐनवेळी पक्षाकडून सांगितले गेल्याने केणे हे निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. २०१४ च्या निवडणुकीत सेनेचे सुभाष भोईर ४४ हजार २१२ मतांनी निवडून आले. मागील निवडणूक शिवसेना भाजपने स्वतंत्रपणे लढवली होती. मात्र भाजपने उमेदवार उभा केला नव्हता.

हेही वाचा :- शेतात ज्वारी कापणीचे काम करताना वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

त्यामुळे भोईर यांचा विजय सुकर झाला होता. ग्रामीण भागात आगरी कोळी भूमीपूत्र केणे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा मिळणार आहे. ग्रामीण परिसर असलेल्या या मतदार संघात २७ गावाचा परिसर येतो. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिकेचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र चार वर्षे उलटल्यानंतरही हे आश्वासन पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे गावकर्‍यांच्या नाराजीचा किती फटका युतीला बसतो हेच पाहावे लागणार आहे.

प्रमुख समस्या

केडीएमसीतील २७ गावांचा परिसर या मतदार संघात येतो. २७ गावातील पाणी समस्येचा प्रश्न, कल्याण शीळ रस्त्याचे सहापदरीकरण करण्योच काम संथ गतीने सुरू असल्याने होणारी वाहतूक केांडी, २७ गावाची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न जैसे थे, २७ गावातील शेतजमीनींवर मोठया प्रमाणात आरक्षण टाकण्यात आले आहे.

२०१४ ची विधानसभेतील मते

सुभाष भोईर (शिवसेना) : ८४, ११०
रमेश पाटील (मनसे) : ३९ ८९८
वंडार पाटील (राष्ट्रवादी) : १९,७८३
शारदा पाटील (काँग्रेस ) : ९२१३

Kalyan कल्याणचे दोन दिग्ग्ज दिनेश तावडे आणि अनिल पंडित भाजपात

 

Leave a Reply

Your email address will not be published.