जनतेची किंवा कोणत्याही संघटनेची मागणी नसताना उरण मध्ये उभारले जात आहे शिवस्मारक

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.१७ – उरणची जनता, येथील स्थानिक भूमीपुत्र,शेतकरी प्रकल्पग्रस्त गेल्या 20 वर्षापासून उरणमध्ये अद्यायावत हॉस्पिटलची मागणी करीत आहेत. गेले 8 वर्षापासून प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्र त्यांच्या मुलांसाठी इंजिनिअरींग कॉलेजच्या उभारणीसाठी प्रशासनाकडे निधी मागत आहेत तसेच JNPT चे चौथे बंदर आणि करंजा इंफ्रास्ट्रक्चर बंदर बाधीत मच्छीमारांना कायद्यातील तरतूदि प्रमाणे अजुन सुद्धा नुकसान भरपाई मिळालेली नाही. येथील मच्छीमार,प्रकल्पग्रस्त, शेतकरी, बेरोजगार युवक उपासमारीने मरत आहे. या उलट JNPT ने CSR फंडातून स्थानिक विकास कामांसाठी निधी खर्च करण्याऐवजी 42 कोटि रुपये रायगड जिल्हयाच्या बाहेर विविध ठिकाणी इतर कामासाठी खर्च केला आहे.आतातर कोणत्याही संघटनेची,कोणत्याही राजकीय पक्षाची वा जनतेची मागणी नसतानाही उरण मधील जासई जवळील दास्तान फाटा येथे भव्यदिव्य असे शिवस्मारक बांधण्यात येत आहे.

हेही वाचा :- आयुध निर्माण कारखान्यांचे (ऑर्डिनन्स फॅक्टरीज्) आधुनिकीकरण

शिवस्मारकाला 30 कोटी तर उदघाटनावर 10 कोटी खर्च करून श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे(शिव स्मारकाचे) उदघाटन आज दि 17 रोजी मंत्री- मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात येत असल्याने सदर स्मारकाचे काम अर्धवट असताना अचानकपणे लोकभावनेचा, जनतेचा विचार न करता, संपूर्ण भारतीय जम्मू कश्मीर येथील भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यातील शहिद जवांनांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुःखात असताना सदर कार्यक्रम रद्द करून पुढे घेण्याऐवजी शिव स्मारक उदघाटनाचा घाट घातला गेल्याने ही उरण मधील समस्त उपेक्षित प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमीपुत्रांची क्रूर चेष्ठाच आहे. सोशल मीडिया वर ही याबाबत विविध नेटीझन्सनी विरोध दर्शविला. प्रशासनाने स्थानिक प्रकल्पग्रस्त, शेतकरी, बरोजगारांच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत शिव स्मारकाचे उदघाटन केल्याने उरण मधील विविध नागरी समस्यांवर कार्यरत असलेल्या ‘उरण सामाजिक संस्था’ या सामाजिक संस्थेतर्फे सदर घटनेचा निषेध म्हणून तसेच उरण मधील मूलभूत नागरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज दि.17/2/2019 रोजी हुतात्मा स्मारक जासई येथे एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

हेही वाचा :- जनतेची किंवा कोणत्याही संघटनेची मागणी नसताना उरण मध्ये उभारले जात आहे शिवस्मारक

यावेळी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल, कार्याध्यक्ष-कॉमरेड भूषण पाटिल, कार्याध्यक्ष दिनेश घरत, उपाध्यक्ष-काशीनाथ गायकवाड, विभाग प्रमुख-रूपेश पाटिल, शहरप्रमुख-शेखर पाटिल, उरण सामाजिक युवा मंचचे अध्यक्ष विलास गावंड, सामाजिक कार्यकर्ते-संतोष पवार,प्राध्यापक राजेंद्र मढवी,पंकज ठाकुर, विनोद कदम,आंग्रज म्हात्रे, वैभव पाटिल ,दिलीप पाटिल हे सर्व संस्थेचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच चिरले येथील सामाजिक कार्यकर्ते-संदेश ठाकुर,काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व अजित म्हात्रे, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटिल,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष भावना घाणेकर,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटनीस मेघनाथ तांडेल, उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत, जासईचे सरपंच-संतोष घरत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी- संदेश ठाकुर,मंगेश वाजेकर,1984 च्या आंदोलनातील जखमी कार्यकर्ता-प्रमोद ठाकुर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी-कार्यकर्ते आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याण शाखा तर्फे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध

उरण सामाजिक संस्थेतर्फे शिव स्मारकाच्या उदघाटनाचा निषेध व नागरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल यांनी उपस्थित उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की दास्तान फाटा उरण येथे श्री छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेल्या शिवरायांचे स्मारक उभारण्यास कोणाचेही विरोध असण्याचे कारण नाही. आमचाही त्यास विरोध नाही. परंतु JNPT बंदर जेथे उभारले आहे त्या उरण तालुक्यात आणि विशेषतः प्रकल्पग्रस्त गावात मागील 30 वर्षापासून आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांची वानवा असताना, नागरिकांची कुठल्याही प्रकारची मागणी नसताना श्री छत्रपतींच्या स्मारकासाठी सुमारे 40 कोटी रुपये आणि त्या स्मारकाच्या उदघाटनासाठी कोटयावधी रुपये खर्च करणे हे कुठल्याही सुज्ञ आणि सुजाण मनास पटण्यासारखे नाही. हा निश्चितच जणकल्याणासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांचा आदर्श होवुच शकत नाही.

हेही वाचा :- कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम दोन महिन्यात पूर्ण..

पुढे ते म्हणाले की जड वाहनांच्या वाहतुकीमुळे आणि अपु-या रस्त्यांमुळे उरण तालुक्यात अपघात होवून मागील 15 ते 20 वर्षात 800 हुन जास्त नागरिक मृत्युमुखी पडले. तालुक्यात अद्ययावत रुग्णालय नसल्याने वेळीच उपचाराअभावी अनेकांना प्राण सोडावे लागले. परंतु तालुक्यासाठी एखादे सुसज्ज अद्ययावत रुग्णालय गोरगरीब जनतेसाठी उभारावे असे JNPT ला आजपर्यंत वाटले नाही.JNPT ने मागील 2 वर्षात CSR फंडातून सुमारे 40 कोटी रुपये खर्च केले परंतु त्यातील एकही पैसा उरण तालुक्यासाठी वापरला नाही. प्रकल्पग्रस्त जनता तालुक्यात अभियांत्रिकी विद्यालय उभारत आहे. त्याला निधिची आवश्यकता असताना सुद्धा JNPT प्रशासनाने एक छदामही दिला नाही.

हेही वाचा :- अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध – अध्यक्ष मंजुषा जाधव

ज्या ज्या शेतकऱ्यांनी देशाच्या विकासासाठी आपल्या जमीनी या JNPT ला दिल्या त्या शेतक-यांचा हा अवमान आहे. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक जनतेसाठी उच्च शिक्षण, नागरी सुविधा, रुग्णालय, आरोग्य या मूलभूत सेवांकडे JNPT प्रशासन व महाराष्ट्र शासनाने जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्व समस्यांची त्वरित दखल घ्यावे व येथील जनतेला न्याय द्यावा यासाठीच हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करावे लागल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल यांनी सांगितले. सदर उपोषण स्थळी अन्य मान्यवरांचेही भाषणे झाली. सदर लाक्षणिक उपोषणाला विविध राजकीय पक्ष,विविध सामाजिक संस्था, विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट देउन या उपोषणास जाहिर पाठिंबा दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email