पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी – ‘सामना’ अग्रलेखातील ‘रोखठोक’

मुंबई दि.०८ :- शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर नक्कीच मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असे ‘सामना’ च्या अग्रलेखात म्हटले आहे. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.

कोपर रेल्वे स्थानकातील नवा पादचारी पूल सुरू

त्यामुळे पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला आणि प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला, असेही मत या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा पवार यांनी करताच देशाच्या राजकारणात खळबळ माजली. पण त्यापेक्षा जास्त त्यांच्याच पक्षात माजली.

महापालिकेतर्फे गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालय

कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.