सर्वसमावेशक, सर्वंकष आणि शाश्वत उच्च आर्थिक विकासासाठी सरकार कटिबद्ध – धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली, दि.०६ – अलिकडच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत भारत प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आले आहे. मजबूत अर्थव्यवस्था आणि सहाय्यक धोरण व्यवस्थेसह सर्वसमावेशक, सर्वंकष आणि शाश्वत उच्च आर्थिक विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास, उद्यमशीलता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :- राष्ट्रपती 2017 वर्षासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार
ते आज नवी दिल्लीत डब्ल्यूएलपीजीए 2019 आशिया एलपीजी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रधानमंत्री उज्वला योजना ही सार्वत्रिक योजना बनली असून, पुढल्या आर्थिक वर्षांपर्यंत 8 कोटी मोफत एलपीजी जोडण्या पुरवल्या जातील असे ते म्हणाले. शेजारी देशांना प्रांतीय सहकार्य पुरवून एकत्रित प्रयत्नांवर भर देण्याचे आवाहन प्रधान यांनी केले. यावेळी याच विषयाशी संबंधित प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांनी केले.