ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, विनायक राणे यांना क्रीडा पत्रकारिता पुरस्कार

( म विजय )

मुंबई दि.१४ :- गेल्या 35 वर्षांच्या क्रीडा पत्रकारितेत पाच हजारांपेक्षा अधिक लेख लिहणाऱ्या, अनेक उदयोन्मुख पत्रकारांसाठी द्रोणाचार्य ठरलेले दै. नवाकाळचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांची महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचे क्रीडा पत्रकार विनायक राणे याची निवड करण्यात आल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी जाहिर केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आपल्या दुसऱ्या क्रीडा पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षापासून महेश बोभाटे आणि आत्माराम मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. यंदा  महेश बोभाटे पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार सुहास जोशींना जाहिर करण्यात आला. 1985 सालापासून क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात सुहास जोशी यांनी फार मोठे योगदान दिले आहे. सांज तरूण भारतपासून सुरू झालेली त्यांची क्रीडा कारकीर्द आजही त्याच उत्साहात सुरू आहे. गेल्या 35 वर्षात त्यांची सांज तरूण भारत, मुंबई तरूण भारत आणि दै.नवाकाळ या दैनिकांत क्रीडा पत्रकारिता बहरली. या दीर्घ कारकीर्दीत त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतभ्रमंती केली. 

हेही वाचा :- महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची विशेष उपस्थिती

2005 साली त्यांनी संस्मरणीय असा युरोप अभ्यास दौराही केला. अनेक ज्यूनियर पत्रकारांसाठी जोशी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या लेखांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना, संघटकांना न्याय मिळवून दिलाय. अनेकांना मदत आणि रोजगार मिळवून देण्यात ते यशस्वी ठरलेत. त्यांनी आजवर दैनिकांसह अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके आणि दिवाळी अंकांमध्ये 5 हजारांपेक्षा अधिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी बऱयाच क्रीडात्मक कार्यक्रमांचे सादरीकरणही केले आहे. त्यांच्या दीर्घ कारकीर्दीचा गौरव युआरएल, राज्य कबड्डी, श्री समर्थ व्यायाम मंदिर, राज्य कॅरम, उपनगर कबड्डी, विचारे प्रतिष्ठान या नामांकित संस्था-संघटनांनी क्रीडा पत्रकारिता पुरस्कार देऊन केला आहे. तसेच दीड दशकांच्या कारकीर्दीत धडाडीची क्रीडा पत्रकारिता करणाऱया विनायक राणे याची आत्माराम मोरे क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विनायकने 2003 साली युवा सकाळमधून आपली क्रीडा पत्रकारिता सुरू केली आणि ती गेल्या12 वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये धडाक्यात सुरू आहे. त्याने प्रो कबड्डी, चेन्नई ओपन, हॉकी विश्वचषक, युवा फिफा विश्वचषकासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन भारताच्या अनेक शहरांमध्ये जाऊन केलेय. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या पहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार विनायक दळवी आणि संदीप कदम हे होते.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email