टाटा समुहाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर

मुंबई आसपास प्रतिनिधी

मुंबई- टाटा समुहाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे.‌
टाटा समूहातर्फे दरवर्षी साहित्य महोत्सव आयोजित केला जातो. हा पुरस्कार या साहित्य महोत्सवात एलकुंचवार यांना प्रदान केला जाणार आहे.

‘गार्बो’, ‘वाडा चिरेबंदी’ ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांत’, ‘आत्मकथा’ ही एलकुंचवार यांची काही गाजलेली नाटके. एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार नाट्यलेखनातून सादर केले असून त्यांच्या नाटकांचे भारतीय आणि पाश्चिमात्य भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत.‌ त्यांची अनेक नाटके इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेतही गाजली आहेत.‌

हा पुरस्कार माझ्यासाठी मौल्यवान आहे.‌ भारतीय भाषांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार मिळतो आहे हे आनंददायी आहे, अशी भावना एलकुंचवार यांनी व्यक्त केली.‌

Leave a Reply

Your email address will not be published.