पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता – शरद पवार
मुंबई दि.०३ :- राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले.
इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
पक्षाचा अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी येत्या ५ मे रोजी बैठक घ्यावी. त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल असेही पवार म्हणाले.
राज्यपालांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी
अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर मला विरोध झालाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी ठरवून घेतला, असेही पवार यांनी सांगितले.