डोंबिवलीत समुद्र मंथनावर साकारला देखावा

डोंबिवली दि.२९ :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय सेवकवर्गाने माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र मंथनाचा आगळावेगळा सध्याच्या सद्य स्थितीवर आधारित देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. २८ ते ०१ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान बेतवडे गावच्या गावदेवी माऊली मंडळाचे भजन होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ दरम्यान काटई गावच्या गोपाळ कृष्ण मंडळाचे भजन होणार आहे. शुक्रवारी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे.

हेही वाचा :- मला हिंदूह्र्दयसम्राट म्हणू नका…

तर सायंकाळी ६ ते ७ दरम्यान बेतवडे गावच्या हनुमान प्रासाद मंडळाचे भजन होणार आहे. विशेष म्हणजे श्रींचा देखावा सादर करताना शास्त्रीनगर हॉस्पिटलचे कामगार रघुनाथ डांगे यांनी अप्रतिम सजावट केली आहे. तर देव-दानव यांनी एकत्र येऊन सागर मंथन करून अमृत मिळवून देशातील कष्ट करणारा शेतकरी आपल्या कष्टाने मेहनातीने धान्य, भाजीपाला उत्पादन करतात. यातून फार कमी मेहनताना त्यांच्या पदरी पडतो. मात्र कष्ट न करता फुकटची मलई (दलाली) काहींना मिळते. सागर मंथन या पौराणिक कथेतून आजच्या घडीची सत्यपरिस्थिती दाखविल्याचे देखावा सादर करणाऱ्याने सदर ठिकाणी लावलेल्या फलकातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email