स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतचे वर्ग
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतचे वर्ग
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने संस्कृत अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. दर शनिवारी हे वर्ग होतील आणि एकूण १५ शनिवार ते घेण्यात येतील. वय वर्षे ७ ते १३ आणि १४ च्यावर असे दोन वयोगट असतील.
प्राथमिक स्तरावर असलेल्या या संस्कृत भाषावर्गामध्ये संस्कृत भाषा लिहिणे, वाचणे आणि बोलण्यास शिकविण्यात येईल. त्याचप्रमाणे वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना स्मारकाच्यावतीने प्रमाणपत्र दिले जाईल. अधिक माहितीसाठी स्मारकाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
दूरध्वनी ०२२-२४४६५८७७/