संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

जामीन याचिकेवर आता ९ नोव्हेंबरला सुनावणी

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०२ :- खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. त्यांच्या जामीन याचिकेवर आता ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत याआधीही वाढ करण्यात आली होती.‌

हेही वाचा :- मुंबई आसपास संक्षिप्त

२१ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे दसऱ्यापाठोपाठ राऊत यांची दिवाळीही तुरुंगात गेली. गोरेगाव येथील पत्रा चाळ कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.