Sanjay Raut ; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो….

मुंबई दि.३१ :- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर मैत्री या त्यांच्या बंगल्यावर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान, संजय राऊत हे फोनवर बोलत खिडकीजवळ आले. त्यावेळी बाहेर शिवसैनिकांनी एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

राऊत यांच्या घराची झडती सुरू असताना राऊतांनी ट्वीट करत कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. असे ट्वीट करत म्हणाले.

ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या परिवारातील सदस्यांची चौकशी करत आहेत. या दरम्यान संजय राऊत आणि परीवारातील काही सदस्यांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली.  या दरम्यान संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांना पुर्ण सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. शिवाय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत असं देखील राऊत अधिका-यांना बोलले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.