केंद्रीय अन्वेषण विभागाकडून समीर वानखेडे यांचा भ्रमणध्वनी जप्त, १८ मे रोजी चौकशी
मुंबई दि.१६ :- केंद्रीय अन्वेषण विभागाने अंमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडे यांचा भ्रमणध्वनी जप्त केला आहे. वानखेडे यांच्यासोबत ‘एनसीबी’च्या अन्य काही अधिकाऱ्यांचेही भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत.
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण जाहीर
१८ मेला समीर वानखेडे यांची सीबीआय पथक चौकशी करणार आहे. या चौकशीपूर्वी सीबीआयकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जप्त करण्यात आलेल्या भ्रमणध्वनींचे तांत्रिक विश्लेषण केले जाणार आहे. वानखेडे यांच्या गोरेगावच्या घरी धाड टाकण्यात आली होती तेव्हा वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांचाही भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला होता.