राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यता
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१८ :- राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
हेही वाचा :- एक कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास
ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबरमध्ये होते. मात्र दिवाळीच्या निमित्ताने खरेदी आणि इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा :- दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात ११० बस दाखल होणार
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत.