जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्ष, अर्जुन, किरणला सुवर्णपदक

कैरो दि.१७ : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल तिहेरी स्पर्धा प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटील, अर्जुन बाबुटा, किरण जाधव यांनी सुवर्णपदक पटकविले. रुद्रांक्षचे स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. या तीन भारतीय खेळाडूंनी चीनचा १६-१० असा पराभव केला. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रुद्रांक्षने याच स्पर्धा प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळविले होते.

हेही वाचा :- बिग बॉस मराठी’च्या घरातून निखिल राजेशिर्के बाहेर

भारताने रविवारी १ रौप्य आणि २ कांस्यपदकेही मिळविली. स्पर्धेत भारताचे चीनपाठोपाठ दुसरे स्थान कायम असून, आतापर्यंत भारताने ५ सुवर्ण, १ रौप्य आणि पाच कांस्यपदके मिळविली आहेत. मन्वी जैन आणि समीर यांनी मिश्र दुहेरीत भारताला पहिले रौप्यपदक मिळवून दिले. पायल खत्री आणि साहिल दुधाने यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published.