शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
मुंबई दि.०१ :- शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातातील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
राज्यपालांच्या हस्ते डिजिटल ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री शिंदे यांनी या दूर्घटनेबाभत दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जण मरण पावले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी जाण्यास सांगितले. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.