Royal Enfield देशातून या तीन बुलेट बंद करणार?

एके काळी Royal Enfield च्या बुलेटने भारतीय रस्त्यांवर राज्य केले आहे. आजही या धाकड बाईकची मागणी प्रचंड असून वर्ष वर्षभर बुलेटप्रेमी पैसे भरून डिलिव्हरीची वाट पाहत असतात. मात्र, याच रॉयल एनफिल्डवर तीन बाईक बंद करण्याची वेळ आली आहे. एचटी मिंटने दिलेल्या वृत्तानुसार रॉयल एनफिल्ड 500 सीसीच्या तीन बाईक बंद करण्याच्या विचारात आहे. यामध्ये Bullet 500, Classic 500 आणि Thunderbird 500 या मोटारसायकल आहेत.

हेही वाचा :- मिरा-भाईंदर शहरास २४ तासाकरीता पाणी पुरवठा खंडित

भारतात 500 सीसीच्या मोटारसायकलला मागणी नसल्याने कंपनी 350 सीसीची मोटारसायकलच अपडेट करणार आहे. या इंजिन क्षमतेच्या बुलेटना मोठी मागणी आहे. तसेच सध्याची इंजिने बीएस ६ मानांकन पूर्ण करत नाहीत. 500 सीसीच्या मोटारसायकल या प्रामुख्याने परदेशांतील बाजारांसाठी बनविण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :- रामदेवला महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही- डॉ. जितेंद्र आव्हाड

भारतात 2009 मध्ये कंपनीने नवीन हलके इंजिन वापरल्याने मागणी वाढली होती. मात्र, आता पुन्हा मागणी घटली आहे.याबाबत कंपनीने अद्याप दुजोरा दिलेला नसला तरीही त्यांनी अन्य बाईकसारखीच या बाईकलाही बदल मिळतील. यासाठी कमी वेळ उरला असल्याचे सांगितले. रॉयल एनफिल्डला सध्या बीएस ६ नुसार इंजिन बदलणे आणि मागणी कमी असल्याने समस्या भेडसावत आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email