शहरांवर पडलेला घाणेरडा डाग पुसण्यासाठी धडपड सुरू स्मार्ट सोसायट्यांसाठी केडीएमसीसह रोटरीचा अभिनव उपक्रम
डोंबिवली दि.१६ :- कल्याण-डोंबिवली शहरात स्मार्ट सोसायटी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील स्मार्ट सोसायट्यांचा शोध घेतला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरांवर अस्वच्छ शहर, प्रदुषित शहर म्हणून एक वेगळा ठपका वजा डाग बसला आहे. हा डाग पुसून काढून शहराची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि रोटरीच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :- पहिल्या टप्प्यातील पुणे मेट्रो एप्रिलपासून धावणार
कल्याण डोंबिवली महापालिका, रोटरी क्लब मिडटाऊन व ठाणे ठाणे डिस्ट्रीट को-ऑप सो यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सोसायटीमध्ये अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा समिती, सोसायटी समिती, रस्ता, पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना अशा आवश्यकत्या बाबी आहेत का ? या विषयी सजग राहणे गरजेचे आहे. आपल्या सोसायटीमध्ये हे नसेल तर ते करण्यासाठी पुढाकार नागरिकांनी घ्यावा, नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रामुख्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे रो. हेमंत मंडके यांनी सांगितले.
हेही वाचा :- डोंबिवलीत चोरांचा धुमाकूळ
नागरिकांना याविषयी किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी स्मार्ट सोसायटी स्पर्धा घेण्याचा विचार केला. त्यासाठी एक गुगल लिंक तयार करण्यात आली असून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर ती व्हायरल करण्यात येणार आहे त्यामाध्यमातून सोसायटी जर परिपूर्ण सोसायटी आहे तर या स्पर्धेत सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सोसायटी समिती सदस्यांपासून ते सोसायटीमध्ये आवश्यक या उपाययोजना, यंत्रणा आहेत का ? याविषयी माहिती प्रश्न विचारण्यात आले आहेत.
हेही वाचा :- ‘आमचे हात जोडलेले आहेत ते असेच राहू द्या’; शर्मिला ठाकरेंचा सरकारला इशारा
या प्रश्नांना गुण दिले असून 80 टक्क्यांच्यावर गुण प्राप्त केलेल्या सोसायट्यांची महापालिका प्रशासन व रोटरीच्यावतीने पाहणी करण्यात येईल. त्यानंतर 26 जानेवारीला सहकारी गृहनिर्माण संस्थांचे स्वयंविकास आणि व्यवस्थापन या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमादरम्यान स्मार्ट सोसायट्यांना गौरविण्यात येणार असल्याचेही रो. मंडके यांनी सांगितले.