दहा लाख तरुणांसाठी उद्या रोजगार महामेळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ

नवी दिल्ली दि.२१ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २२’ऑक्टोबर रोजी रोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दूरदृश्य संवाद प्रणालीमाध्यमातून होणा-या या मेळाव्यात ७५ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. संपूर्ण देशभरातून निवडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारची ३८ मंत्रालये आणि विविध विभागांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा :- मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड

यात केंद्रीय सशस्त्र दल, उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, कनिष्ठ लिपिक, स्वीय सहाय्यक, आयकर निरीक्षक आणि अन्य पदांवरील नियुक्त्यांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब- अराजपत्रित तसेच गट-क आणि गट- ड पदभरतीसाठी नामनिर्देशनाद्वारे परीक्षा घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.‌ त्यामुळे शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

2 thoughts on “दहा लाख तरुणांसाठी उद्या रोजगार महामेळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published.