* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> युवकांमधील वाढता हृदयविकार चिंताजनक – राज्यपाल बैस – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

युवकांमधील वाढता हृदयविकार चिंताजनक – राज्यपाल बैस

मुंबई दि.०७ :- ‘कार्डियाक इमेजिंग’ सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान आणि उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून लाखो लोकांना त्यामुळे जीवनदान मिळत आहे. मात्र २० ते ३० वयाच्या युवकांमध्ये दिसून येणारा हृदयविकारचिंतेची बाब आहे. हे थांबविण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. ‘कार्डियाक इमेजिंग व क्लिनिकल कार्डिओलॉजी’ या विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत सांताक्रुझ येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला, कार्डियाक इमेजिंग वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सी एन मंजुनाथ, वर्ल्ड फेडरेशन ऑफ कार्डियाक इमेजिंग अँड क्लिनिकल कार्डिओलॉजीचे अध्यक्ष डॉ जी एन महापात्रा, इंदूरच्या श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक डॉ विनोद भंडारी आदी उपस्थित होते.

गोरेगाव, कांदिवली परिसरात ९ आणि १३ ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती सामान्य रुग्णांकरिता खर्चिक असतात. अश्या चाचण्यांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बव्हंशी विदेशात तयार होतात व ती महागडी असतात. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपकरणे देशात तयार झाली तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल, असे राज्यपाल बैस यांनी सांगितले.

‘झोपू’ योजनेतील सर्व इमारतींचे आग प्रतिबंधक सर्वेक्षण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जीवनशैली आजारांच्या बाबतीत भारतात गंभीर परिस्थिती असून हृदयविकार रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व अलीकडच्या काळात स्क्रीन ऍडिक्शन वाढत आहे. हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक- तृतीयांश चाळीशीच्या आतील वक्तींचे होत आहेत. वाढत्या हृदय विकारांमागे हवेतील प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचे प्रकाशात आले आहे, असे वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष व हृदयरोग तज्ज्ञ डॉ सी आर मंजूनाथ यांनी यावेळी सांगितले. लहान मुलांची झोप नीट व्हावी व मुलांची तयारी करताना पालकांचा देखील ताणतणाव कमी व्हावा, यासाठी मुलांच्या शाळा साडेदहा पासून सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘कार्डियाक इमेजिंग अपडेट – २०२३’ या पुस्तकाचे तसेच परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *