कल्याण पूर्वेत रिक्षा बंद…प्रवासी बेहाल
कल्याण :- कल्याण पूर्वेतील फुटपाथ फेरीवाला मुक्त व्हावे तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावी यासाठी शिवसेनेच्यावतीने बेमुदत उपोषण छेडण्यात आले होते. तसेच रस्त्याची कामे त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी रिक्षा संघटनेच्यावतीने कल्याण पूर्वेत रिक्षा बंद पुकारण्यात आला होता. शुक्रवारी सकाळपासून रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचे खूपच हाल झाले. मात्र शिवसेनेच्या उपोषणाची दखल घेत पालिकेने अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.
हेही वाचा :- गावठी पिस्तूलासह दोघे तरुण गजाआड महात्मा फुले पोलिसांची लक्षवेधी कारवाई
काटेमानिवली नाका ते गणेश मंदिर चौक ते सिद्धार्थनगर रमाई चौक ते म्हसोबा चौक-तिसगांव नाका या रस्त्यावरील अतिक्रमणे पुरेसा वेळ देऊनही महापालिकेच्या प्रभाग 4 जे अधिकाऱ्यांनी हटविली नसल्याचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गणेश मंदिर चौकात सामाजिक संस्था संघटना आणि रिक्षा चालक मालकांनी बेमुदत उपोषणासह सकाळ पासून आंदोलन छेडण्यात आले होते.
हेही वाचा :- राष्ट्र कल्याण पार्टी चा जाहीर पाठिंबा…
काटेमानेवली ते गणपती मंदिर आणि गणपती मंदिर ते तिसगाव नाका रस्ता लवकर व्हावा या मागणीसाठी शिवसेना कल्याण शहर सह संपर्क प्रमुख कोलशेवाडी आणि रिक्षा संघटनेने शुक्रवारी सकाळपासून रिक्षा बंद करण्यात आल्या असल्याने प्रवाश्यांचे हाल झाले, या मागणीसाठी कल्याण पूर्व येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले. मात्र संध्याकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.