वीज कंत्राटी कामगारांना बदल्यांचे बक्षीस

 

वीज कंत्राटी कामगारांनी महसूल वाढवला राज्यभर वीज यंत्रणा सुरळीत ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला, अनेक कामगार शहीद झाले त्यांच्या न्याय हक्कासाठी सलग 3 वर्षे आंदोलने करून देखील प्रशासनाने समस्यां सोडवल्या नाहीत उलट पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक मा.अंकुश नाळे यांनी सुमारे 4000 कष्टकरी कामगारांवर नाहक खोटे आरोप लावून त्यांच्या बदल्या करण्याचे तुघलकी फर्मान काढले आहे. हे आरोप मागे घ्यावेत व बदल्या रद्द कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ ) संघटने पत्राद्वारे केली.

सोमवार दिनांक 6 जून रोजी महावितरण कंपनीचा 17 वा वर्धापन दिवस आहे. प्रादेशिक संचालक यांनी संघटनेशी सोमवारी सकाळी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा अन्यथा 6 जून रोजीच सर्व जिल्ह्यात दुपार नंतर कामगारांना नाईलाजास्तव या बाबत निषेध आंदोलन करावे लागेल असा ईशारा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिला आहे.

कंत्राटदारांवर कारवाई न करता कामगारांनाच शिक्षा केल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी गत झाली आहे. हे आरोप व बदल्या कामगारांना व संघटनेला मान्य नाही त्यामुळे पुन्हा पावसाळ्याच्या तोंडावर राज्य व्यापी आंदोलनाची भूमिका संघटनेला घ्यावी लागेल.

असा इशारा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.