टेम्पो उलटल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई, दि. ३
टपाल कार्यालयातील वितरणाचे टपाल आणि इतर पार्सल घेऊन जाणारा एक टेम्पो शनिवारी दुपारी पूर्व द्रुतगती महामार्गावर उलटल्याने या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हा टेम्पो हलविण्यासाठी क्रेनची वाट न पाहता काही नागरिकांनी रस्त्यावर उलटलेला टेम्पो उभा केला आणि वाहतूक सुरळीत झाली.
शीव येथून नवी मुंबईच्या दिशेने दुपारी एकच्या सुमारास हा टेम्पो जात होता. पूर्व द्रुतगती मार्गावरील एव्हरार्ड नगर येथे अचानक वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो उलटला.
—-