‘दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा दलित पँथर सुरू करा

मुंबई दि.२४ :- दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष महाराष्ट्रात साजरे होत आहे. या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त भारतात पुन्हा दलित पँथर सुरू करावी. त्यासाठी पँथर रामदास आठवले यांनीच  पुढाकार घ्यावा अशी सूचना अमेरीकेतील आंबेडकरी अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केली.

आगामी निवडणुकांत हरलो तर देशातून लोकशाही गायब होईल – उद्धव ठाकरे

आठवले हे अमेरिका दौऱ्यावर असताना न्यूजर्सीमधील आंबेडकरी अनुयायांच्या बैठकीत आंबेडकरी अनुयायांशी आठवले यांनी संवाद साधला. त्यावेळी अमेरिकेतील आंबेडकरी अनुयायांनी भारतात पुन्हा दलित पँथर ची गरज असल्याचे मत व्यक्त केले. न्यूजर्सी येथील थाई बुद्ध विहारात बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान रामदास आठवले यांचे अमेरिकेच्या दौऱ्यावरून आज मुंबईत आगमन झाले. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.