* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ठाणे भाजप तर्फे आयोजित धरणे आंदोलनात आमदार संजय केळकर यांची सरकारवर घणाघाती टीका.. – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

ठाणे भाजप तर्फे आयोजित धरणे आंदोलनात आमदार संजय केळकर यांची सरकारवर घणाघाती टीका..

(म.विजय)

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा नेते आमदार संजय केळकर व भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप नेते आ. संजय केळकर यांच्या भाषणाने आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी ठाण्यातील भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. 

हेही वाचा :- Kalyan ; शिवीगाळ केल्याचा राग धरून चाकूने भोसकले

आताचे सरकार हे केवळ स्थगिती सरकार नसून फसवं सरकार आहे अशी घणाघाती टीका आ. केळकर यांनी सरकारवर करून शेतकरी, महिला, तरुण यांना वेठीस धरण्याचं, फसवणूक करण्याचं काम राज्यकर्ते करत आहे. महिलांवर अत्याचारांचे प्रणाम वाढले असून गुहेगार प्रवृत्तीच्या लोकांना या सरकारचा धाक राहिला नाही तर अनेक तरुणांच्या हाताला काम नाही केवळ त्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे असे आ. केळकर यांनी भाषणात बोलताना सांगितले.

हेही वाचा :- डोंबिवलीत बुध्दीबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अगोदरच्या फडणवीस सरकारवर केवळ सूड उगवण्याचे काम हे सरकार करत असून लोकांसाठी सुरू केलेल्या योजना केवळ बंद करण्याचे काम हे सरकार करत आहेत. याने रयतेच भलं होणार नाही आणि जनताही यांना माफ करणार नाही असे आ. केळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *