ठाणे महापालिका निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण

ठाणे दि.१० :- ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. वसतीगृहाच्या नूतनीकरणाचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने यांच्याकडून माफीचा साक्षीदार होण्यासाठीची याचिका मागे

वसतीगृहाच्या नूतनीकरण कामाची आखणी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामाची प्रगती याचा दिवसवार आराखडा तयार करून त्याप्रमाणे जलद काम करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. सध्या उपहारगृहाच्या वरती असलेल्या वसतीगृहाच्या मुख्य इमारतीमध्ये ७८ आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील वसतीगृह क्रमांक ०८ मध्ये २८ निवासी डॉक्टर राहतात. इमारतीचे बांधकाम परिक्षण करण्याबरोबरच अंतर्गत भागाची दुरुस्ती, स्नानगृह, शौचालय यांची पुरेशी व्यवस्था, खोलीच्या आतील रचना यांच्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे आयुक्त बांगर यांनी या बैठकीत सांगितले.

आदित्य ठाकरे आणि राज्यपाल बैस यांची राजभवनवर भेट अर्धा तास चर्चा

इमारतीचे नूतनीकरण करताना त्यात एकूण १०० निवासी डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था केली जावी. तसेच, पुरेसा सूर्यप्रकाश, वायुविजन यासाठी आवश्यक ते बदल केले जावेत. व्यायामशाळेची रचना चांगली करावी. प्रवेशद्वारे मोठी आणि कोणत्याही अडथळ्याविना असतील हे पहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरांना सर्वोच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची तत्काळ अमलबजावणी केली जावी, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.