परराज्यातील दोन हरविलेल्या मुली आई वडिलांच्या ताब्यात ठाणे पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी

(म विजय)

ठाणे दि.१२ – ठाणे रेल्वे स्टेशन येथे २५ दिवसापूर्वी एक १७ वर्षाची महिला व तिच्या सोबत ३ ते ४ वर्षाची एक लहान मुलगी बेवारस पणे मिळुन आल्या होत्या , उत्तरप्रदेश येथिल ह्या मुलींचा पत्ता शोधुन त्यांच्या आईवडिलांना इथे बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहेत. दिनांक १२/०१/२०१९  रोजी शनीचरण वय १७ वर्ष व शनिया वय ४ वर्ष ह्या दोन बहिणी चुकुन उत्तरप्रदेश येथुन मुंबई येथील ट्रेन मध्ये बसल्या व ठाणे स्टेशन येथे पोहचल्या , त्यातील शनिचरण ही १७ वर्षाची तरुणी मनोरुग्ण आहे. ह्या दोघी ठाणे स्टेशन येथे अशाच बेवारस स्थिथित फिरत होत्या. ठाणे कोपरी पोलीस स्टेशनने त्यांना ताब्यात घेउन त्यांची विचारपूस केली असता त्यांना स्वतःहा बद्दल काहीही सांगता येत नव्हत.

हेही वाचा :- डोंबिवलीत काही भागात झेरॉक्स दरात दुप्पट वाढ

त्यांच्या पालकांचा शोध होईपर्यत व त्यांना सुरक्षित ठेवण्याकामी मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांच्या पुढे हजर केले असता मोठ्या मुलीस मनोरुग्णालय ठाणे येथे उपचारार्थ व लहान मुलीस जननी आशिष संस्था डोंबिवली येथे सुरक्षित ठेवण्याचे आदेश पारित केले. मनोरुग्णालय ठाणे येथील वैद्यकीय डॉ .संजय बोधडे यांनी मनोरुग्ण महिलेवर उपचार सुरु केले. न्याय दंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व ठाणे नगर पोलीस ठाण्याचे रविकांत मालेकर यांना दोन्ही मुलींच्या पालकांचा शोध घेण्याचे आदेश दिल. पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी एक स्वतंत्र पोलीस पथक तयार करून भोजपुरी भाषेची माहीती असलेली महिलेस मदतीस घेउन मनोरुग्ण महिलेकडे सतत जाऊन तिची चौकशी करून मिळालेल्या अपुऱ्या व त्रोटक माहितीच्या आधारे व तांत्रिक सहाय्याने मुलींच्या पालकांचा शोध लावला.

हेही वाचा :- भारत-पाकिस्तान सीमेवरचे कुंपण

उत्तर प्रदेश येथील दिलदार नगर पोलीस स्टेशनचे एस एच ओ विमल मिश्रा यांच्या मदतीने मुलींचे वडील कमलेश राय यांच्याशी संपर्क साधून दोन्ही मुली त्यांच्याच असल्याची खात्री केली , या दोन्ही मुली त्यांच्या आत्या कडे रहायला गेल्या होत्या , दिनांक १२/०१/२०१९  रोजी रेल्वेने घरी येणासाठी निघाल्या होत्या , परंतु त्या घरी नपोहचता रेल्वेने थेट ठाणे येथे आल्याचे निष्पन्न झाले. या दोन बहिणींचा शोध त्वरित लागावा या साठी न्यायदंडाधीकारी राजेंद्र तांबे यांनी वयक्तिक लक्ष घालुन पोलीस यंत्रणेला आदेश दिले होते , तसेच स्वखर्चाने नवीन कपडे व जीवनावश्यक वस्तु घेउन दिल्या ,या प्रकरणी पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकात मालेकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड यांनी आपापल्या परीने दोन्ही बहिणींच्या पालकांचा शोध घेण्याच्या कामी अवरीत परिश्रम घेतले .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email