* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ‘महारेरा’कडे नोंदविलेल्या ७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित; बँक खातीही गोठवली – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

‘महारेरा’कडे नोंदविलेल्या ७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित; बँक खातीही गोठवली

मुंबई दि.२१ – महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) नोंदविलेल्या ७४६ प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्यात आली असून बँक खातीही गोठविण्यात आली आहेत. संबंधित प्रकल्पातील विकासकांना जाहिरात तसेच विक्री करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

अकरावीच्या पाचव्या विशेष प्रवेश फेरीनंतरही मुंबई महानगरातील २४ हजार ७२५ विद्यार्थी प्रवेशाविना

३८८ प्रकल्पांनी २० एप्रिलपर्यंत स्थावर संपदा अधिनियमानुसार, पहिल्या तीन महिन्यात किती सदनिकांची नोंदणी झाली, त्यापोटी किती रक्कम जमा झाली आणि त्यापैकी किती रक्कम खर्च झाली, इमारत आराखड्यात झालेला बदल (असल्यास) आदी तपशील असलेले संकेतस्थळावर नोंदवणे, अद्ययावत करणे अत्यावश्यक होते.

कडोंमपा परिवहन सेवेच्या ताफ्यात दहा विद्युत बस दाखल होणार

याची पूर्तता न केल्यामुळे या विकासकांना आधी १५ दिवसांची आणि नंतर कलम सात नुसार प्रकल्पाची नोंदणी रद्द किंवा स्थगित का करू नये अशी गंभीर स्वरूपाची ४५ दिवसांची नोटीस महारेराने बजाविली होती. यालाही प्रतिसाद न देणाऱ्या ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा कठोर निर्णय महारेराने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *