आता सरकारी योजनांचेही (Reels)… ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचा आगळा प्रयोग

ठाणे दि.०४ :- सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने ‘रिल्स’ तयार केले आहे. या रिल्सचे प्रकाशन नुकतेच ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते झाले. जिल्हा माहिती कार्यालयाने केलेला राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

महापालिका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी ऑनलाईन आरक्षण

अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गासाठी असलेल्या पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, यूपीएससीच्या व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी आर्थिक मदत, स्टँडअप इंडिया, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुलींसाठी असलेली सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत या योजनांचे रिल्स तयार करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.