हज विभागाच्या नवीन कार्यालयाचे मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, दि.१६ – स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशातील 2300 हून अधिक मुस्लिम महिला यावर्षी मेहराम (पुरुषसोबती) शिवाय हज यात्रेला जाणार असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आर.के.पुरम येथे हज विभागाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावर्षी 2340 मुस्लिम महिलांना मेहरामशिवाय हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिकाला खंडणीची आणि जीवे ठार मारण्याची धमकी..
यावर्षीही लॉटरी प्रणाली शिवाय या महिलांना हज यात्रेला पाठवण्याची व्यवस्था अल्पसंख्याक व्यवहार मंत्र्यांनी केली आहे. गेल्या वर्षी 1300 भारतीय मुस्लिम महिला मेहरामशिवाय हज यात्रेला गेल्या होत्या. हज यात्रेवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्यामुळे हज यात्रेकरूंकडून अंदाजे 113 कोटी रुपयांची बचत होईल. तसेच यामुळे विविध ठिकाणांहून हज यात्रेसाठी विमान भाड्यात लक्षणीय घट होईल असे नक्वी म्हणाले. हज यात्रेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केल्यामुळे संपूर्ण हज प्रक्रिया पारदर्शक झाली आहे.