ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विक्रमी ‘जीएसटी’ संकलन

मुंबई दि.०१ :- ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) विक्रमी संकलन झाले. महाराष्ट्रात २३ हजार कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात दोन हजार कोटींचे अधिक संकलन झाले असून ‘जीएसटी’ संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक राज्यात ऑक्टोबर महिन्यात १० हजार ९९६ कोटींचे ‘जीएसटी’ संकलन झाले.

हेही वाचा :- पिसे जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे मुंबईत १० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के पाणीकपात

ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात सुमारे १ लाख ५१ हजार ७१८ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. ऑक्टोबरमध्ये देशातील वस्तू आणि सेवा कर संकलन १६.६ टक्क्यांनी वाढले असून १.५१ लाख कोटी रुपये कर जमा झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘जीएसटी’ संकलन १.३० लाख कोटी इतके होते.‌

Leave a Reply

Your email address will not be published.