हवाई दल कमांडर परिषदेचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, दि.११ – संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज नवी दिल्लीत हवाई दलाच्या मुख्यालयात (वायू भवन) दुसऱ्या द्वैवार्षिक हवाई दल कमांडर परिषदेचे उद्घाटन केले. हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल बी.एस.धनोआ यांनी त्यांचे स्वागत केले आणि हवाई दलाच्या कमांडर्सची ओळख करून दिली.
यावेळी हवाई दलाच्या कमांडर्सना संबोधित करताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी हिंदी महासागर तटीय क्षेत्रात भारताला सुरक्षा प्रदाता म्हणून सक्षम बनवण्यासाठी हवाई दलाद्वारे पार पाडण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. भारतीय हवाई दल देशाची स्थिती मजबूत बनवण्यासाठी तंत्रज्ञान क्षमतांनी युक्त असे जलद कारवाई करणारे सैन्य दल आहे, असे ते म्हणाले. भारतीय हवाई दल स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देत असून यामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक बचत होईल. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे ते म्हणाले.
दोन दिवसीय या परिषदेत प्रशिक्षण आणि युद्ध कौशल्यावर चर्चा होईल.