Narendra Modi यांच्या ‘संन्यासा’च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

मुंबई दि.०५ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्विटरवर एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. येत्या रविवारपासून मोदी सोशल मीडिया सोडणार असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहे. मोदींच्या सोशल मीडिया सोडण्यामागे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. यावरून दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मोदींवर आणि भाजपावर टीका करणारी पोस्ट चर्चेत आली आहे.

हेही वाचा :- प्रदूषण नियंत्रण मंडळाला कुणी घर देता का घर ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. याची कल्पना त्यांनी नुकतीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. याचे संकेत त्यांनी दिलेले असले तरीही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडिया सोडू नका, द्वेष सोडा असा खोचक टोला लगावला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटवरून सोशल मीडियामध्ये भूकंप आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचे भाकित दोन वर्षांपूर्वीच केले होते.

हेही वाचा :- २३ शेल कंपन्यांचा समावेश असलेल्या ७८९६ कोटी रुपयांचे बनावट चलन बनवणारे मुख्य रॅकेट उघडकीस आले

राज ठाकरेंनी 26 सप्टेंबर 2017 रोजी केलेली ही पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिलंय की, ‘भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय. निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते.

हेही वाचा :- दीड हजारांची लाच स्वीकारताना महिला पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात

त्यांना ‘ट्रोल्स’ च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला ‘जुमला’ होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत.’ अशा आशयाची राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email