Raj Thackeray ; उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही…

मुंबई दि.२४ :- मध्यंतरी २०१४ व २०१७ या वर्षांमध्ये राज आणि उद्धव यांच्यात टाळी देण्यावरूनही जोरदार चर्चा झाली. तसेच शिवसेना-मनसे युतीचे तर्कवितर्क लावले गेले. याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे विश्वासार्ह नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे हा माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही. शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झालं नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले  ते शनिवारी (२३ जुलै) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा :- Amit Thackeray : शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी होऊ, पण…..

शिवसेनेमध्ये फुट बघायला मिळत आहे, जी परिस्थिती तयार झाली त्या परिस्थितीला तुम्ही कोणाला कारणीभूत ठरवाल? शिवसैनिक जबाबदार आहे? की मग भाजपने शिवसेना फोडली? की मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना फोडली? यावर ते म्हणाले, त्या दिवशीच माझ्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटले उगाच फुकटचे श्रेय नका घेऊ, जी गोष्ट घडली आहे, ती गोष्ट ना तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली, याचं श्रेय उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल.. असेही ते म्हणाले.

Hits: 18

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email