कोकण रेल्वेमार्गावर तीन पोलीस ठाणी स्थापन करण्याचा लोहमार्ग पोलिसांचा प्रस्ताव

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.‌२० :- कोकण रेल्वेवरील स्थानके आणि या मार्गावरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणी स्थापन करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.

सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकी हिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होत असून या हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे.

रोहा, रत्नागिरी आणि कणकवली येथे ही पोलीस ठाणी स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या पोलीस ठाण्यांसाठी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आदी मनुष्यबळही पुरविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.