राहूल गांधी यांची पदयात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२२ :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात येत्या ७ नोव्हेंबरला दाखल होणार आहे.‌ नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे या यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होणार असून नांदेड येथे राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा होणार आहे.‌

हेही वाचा :- दहा लाख तरुणांसाठी उद्या रोजगार महामेळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ

भारत छोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या १७ दिवसांच्या दौऱ्याचे नियोजन आधी करण्यात आले होते.‌ मात्र आता ही पदयात्रा १४ दिवसांची असणार आहे.‌ राज्यात मराठवाड्यातील दोन आणि विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये ही यात्रा फिरणार आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील भारत जोडो पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी तयारीला लागले आहेत.

One thought on “राहूल गांधी यांची पदयात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात

Leave a Reply

Your email address will not be published.