कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ४३ ठेकेदारांच्या विरोधात नवी मुंबई महापालिकेची दंडात्मक कारवाई
वाशी दि.१९ :- पावसाळापूर्व गटारसफाईच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ४३ ठेकेदारांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई केली आहे.
अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा उद्या रंगणार
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरातील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारांमधील गाळ काढण्याचे काम चालू आहे. यामध्ये ९६ ठेकेदारांमार्फत शहरातील दैनंदिन कचरा तसेच पावसाळापूर्व गटारसफाईचे काम चालू आहे. सध्या ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचा विशेष कृती आराखडा
ज्या गटारांमध्ये सुका गाळ (माती) निघणार आहे, तो चोवीस तासामध्ये त्वरित उचलून नेण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. मात्र, तरीही काही ठेकेदारांकडून हे काम केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा ४३ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.